स्थैर्य,म्हसवड दि. ३: अल्पावधीतच सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अकाली बदलीने सर्वसामान्य जनतेत नाराजीचा सुर उमटत असुन शासनाने बदली रद्द करण्याची मागणी होत आहे.
माण-खटावच्या प्रांताधिकारी म्हणून अश्विनी जिरंगे यांनी एक वर्षभरापुर्वी सूत्रे स्विकारली होती.त्यानंतर त्यांनी नेहमीच जनहिताचे निर्णय घेऊन आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती.जिल्ह्यात कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातलं असल तरी त्यांनी माण-खटाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे .त्यामुळे येथील आकडेवारी नेहमीच कमी राहिली आहे .सर्वसामान्यांची कामे वेळेत करण्याचा त्यांचा हातखंडा आहे.तसेच त्यांनी बोकाळलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी मोठ्या कारवाया करून वाळू तस्करांचे कंबरडे मोडले होते .त्यांनी कोरोना काळात केलेले उल्लेखनिय काम माणवासिय कधीच विसरू शकत नाही.नुकतीच राज्य शासनाने त्यांची मुदतपुर्व बदली केली असल्याने सर्वसामान्य जनतेत हूरहूर निर्माण झाली असुन जनतेत नाराजीचा सुर उमटु लागला आहे.
म्हसवड शहरातील कोरोना सेंटर सुरु करण्यात महत्वाची भुमिका –
म्हसवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना येथील सर्वसामान्य रुग्णांना बाहेरच्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नसल्याने शहरवासीयांनी एकत्र येत लोकसहभागातुन म्हसवड शहरात कोव्हीड रुग्णालय सुरु केले त्यामुळे अनेकांना सदरचे हे रुग्णालय आधारवड ठरत आहे, मात्र सदरचे हे रुग्णालय जरी लोकसहभागातुन सुरु झाले असले तरी ते सुरु करण्यासाठी जेवढे म्हसवडकर उत्सुक होते तेवढाच उत्साह प्रांताधिकारी जिरंगे यांनी येथे दाखवल्यानेच म्हसवडकर जनतेतुन त्यांच्या बदलीविषयी नाराजीचा सुर उमटत आहे.