दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । फलटण । बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांपैकी एक इसम त्याचे नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्यासाठी सदर बैलगाडा शर्यतीचे आयोजक नितीन जगन्नाथ वरे रा. पवारवाडी, ता. फलटण यांना आग्रह धरत होता. त्यास नितीन जगन्नाथ वरे यांनी नकार देताच त्या दोघांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली. त्यांचा वाद पाहुन बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले व बैलगाडा शर्यतीचे आयोजक असे दोन्ही बाजूचे लोक त्या भांडणामध्ये पडुन आरडाओरडा करीत एकमेकांना धक्काबुक्की करून करुन सार्वजनिक शांतता बिघडवत होते. योग्य वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणुन वीस आरोपीना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पवारवाडी, ता. फलटण येथील जमीन गट नं. ५७ मधील विनायक सदाशिव मोहिते यांचे शेतजमीनीमध्ये पवारवाडी गावच्या जोतिर्लिंग यात्रेनिमित्त नितीन जगन्नाथ वरे व त्यांच्या इतर सहकार्यांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते.
त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी, पोलीस हवालदार शेळके, पोलीस कॉन्स्टेबल अवघडे, होमगार्ड धिरज राजेंद्र भोसले, आकाश राजकुमार सावंत व आकाश राजाराम घाडगे असे बंदोबस्ता करीता सदर ठिकाणी सकाळी ०८.०० वा. पासून कर्तव्यावर हजर होते. बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनी प्रशासनाकडुन रितसर परवानगी घेतल्यामुळे फलटणच्या नायब तहसिलदार श्रीमती दिपाली संपतराव बोबडे, आसूचे मंडलाधिकारी कोकरे व चालक भिसे हे देखिल बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित होते.
आरोपी नामे नितीन जगन्ना वरे, सुहास आनंदराव पवार, विकास ज्ञानदेव वरे, चंद्रकांत दत्तात्रय पवार, अजित पोपटराव हजारे, राजेंद्र भानुदास पवार, सुधीर मारुती पवार, राहुल जगन्नाथ बरे, धनराज बाळासाहेब पवार, वैभव महादेव पवार, चांगदेव वसंत चव्हाण, गणेश संभाजी चव्हाण, शिवाजी रामचंद्र कदम, बाळु सोपान जगदाळे, राजेंद्र संपत चव्हाण सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण अशी असल्याचे सांगितले. तसेच बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी त्यांची नावे तानाजी मधुकर गुरव, दत्तात्रय भाऊसो गावडे, किशोर भगवान भोसले, बाळासाहेब नारायण यादव, हनुमंत महादेव खारतोडे सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण जि.सातारा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.