जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा जलद गतीने निपटारा करा : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि. १६: जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती स्तरावर निकषांची  पूर्तता करून जलद गतीने  निपटारा  करण्याचे  निर्देश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी  दिले आहेत.

काल जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत उपाध्यक्ष श्री. झिरवाळ  बोलत होते. या बैठकीस  सर्वश्री  आमदार हिरामण खोसकर, नितिन पवार, माणिकराव कोकोटे, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, अकोलेचे आमदार किरण लहामटे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आदिवासी विभाग हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितिन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, अपर आयुक्त आदिवासी विभाग गिरीष  सरोदे, मुख्य वनसंरक्षक नितिन बुधगे, उप वनसंरक्षक तुषार चव्हाण, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, राजूरचे प्रकल्प अधिकारी राजूर संतोष ठुबे, कळवण प्रकल्प अधिकारी विकास मीना उपस्थित  होते.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यावेळी म्हणाले की, वनपट्टेधारकांच्या दावे पूर्तता करण्यासाठी तालुका  स्तरावरील समितीकडून  दावे पूर्ततेस  आवश्यक असलेले तीन पुरावे दावेदारांना उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. वनअधिकारी  यांनी सदर प्रकरणांतील जुने दस्तावेज तपासून आवश्यक पुरावे उपलब्ध करून प्रकरणांचा जलदगतीने निफटरा होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी दिल्या आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले, अनुसूचित जमातीच्या बांधवांपर्यंत खावटी योजनेचा लाभ  पोहचणे आवश्यक आहे. याबाबत सर्वेक्षण करतांना लाभार्थ्यांकडे आधार कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रे जर नसतील, तर प्रकल्प अधिकारी  स्तरावर शिबीराचे आयोजन करून त्यांची  पूर्तता करून घ्यावी.

आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह प्रवेशाबाबत जनजागृती करावी.

शैक्षणिक आढावा घेतांना  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, या वर्षी इयत्ता 10 वी व 12 वीचा निकाल शंभर टक्के असल्याने, शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक सूचना येण्याआधी  वसतिगृहांतील  प्रवेश क्षमतेच्या दृष्टीने योग्य नियोजन करून आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृह प्रवेशाबाबत जनजागृती करावी. तसेच अवकाळी पाऊसामुळे ज्या आश्रमशाळा व वसतीगृहांचे नुकसान झाले आहे, त्यांची तातडीने दुरूस्ती करावी. ज्या आश्रमशाळांच्या  जमिनी  अजुनही  मुळ मालकांच्या नावे आहेत, त्या जमीन या विभागाच्या नावावर करून घेण्याची प्रक्रिया  प्रकल्प अधिकारी स्तरावर राबविण्यात यावी, अशा सूचना श्री. झिरवाळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोविड लसीकरणाला  गती  देण्यासाठी आदिवासी  बांधवांमध्ये जावून  त्याबाबत जनजागृती केल्यास नक्कीच लसीकरणाला चालना मिळेल असा विश्वास श्री. झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

शिक्षणमित्रसंकल्पनेतून शिक्षणाला देणार गती: हिरालाल सोनवणे

कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने एक गाव एक शिक्षणमित्र’ अशी संकल्पना आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात शिक्षणमित्राची मानधन तत्वावर नियुक्ती करुन, दुर्गम, आदिवासी भागात शैक्षणिक गंगा पोहचविण्याचे काम आदिवासी विभागातर्फे करण्यात येत आहे. तसेच आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना वाटप होणारे अन्नधान्य सुध्दा विद्यार्थ्यांना घरपोच पोहचविले जाणार असल्याचेही  आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी सांगितले. यावेळी सांगितले.

यावेळी आदिवासी  प्रकल्प अधिकारी नाशिक, कळवण व राजूर यांनी प्रकल्पानुसार आढावा यावेळी सादर केला.


Back to top button
Don`t copy text!