सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीतील नाराज कार्यकर्ते, नेत्यांनी केली वंचित संघर्ष मार्चची स्थापना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । फलटण । नव्याने जाहीर झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीमध्ये डावलण्यात आलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते, नेत्यांच्या रविवार दि. २४ रोजी फलटण येथे दुपारी ३ वा. वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र माजी उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व विंगचे पदाधिकारी जुने जाणते नेते कार्यकर्ते अनेक वर्षे भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन होईपर्यंत ज्यांनी ज्यांनी आहो रात्र ‌पक्ष वाढीसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पक्ष वाढविला. अशा लोकांना बाजूला करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वाढीला खीळ बसवली. त्यात वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण ‌देसाई, गणेश भिसे, फलटण तालुक्यातील अरविंद आढाव,अशोक भोसले, डी. पी अहिवळे, सातारा पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांना पक्षाचे काहीही देण घेण नाही.त्यांना फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये नाव व पद पाहिजे तसेच त्यांना मनमानी कारभार करता यावा. त्यांना पक्षाचे उमेदवार उभे न करता तडजोडी करता याव्यात हाच त्यांचा उद्देश असून त्यांना पक्षात निष्ठावंत नेते कार्यकर्ते नको आहेत. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांना जवळ करून निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांना डावलले. वंचित बहुजन आघाडीला सातारा जिल्ह्यातून संपवण्याच्या डाव त्यांनी आखला आहे. असे आरोप डावलण्यात आलेल्या निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

यावेळी चंद्रकांत खंडाईत (आप्पा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.निष्ठावंत कार्यकर्त्यांना व अनेक वर्षे भारिप मध्ये काम केलेल्या नेत्यांना डावल्याने सर्व कार्यकर्ते व नेते इतर पक्षात जातील की स्वतंत्रपणे नव्याने नवीन संघटन निर्माण करतील अशी शक्यता होती परंतु तसे न करता वंचित संघर्ष मोर्चा या नावाने नवीन संघटनेची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती सुभाष गायकवाड यांनी दिली आहे. श्रद्धेय बाळासाहेब तथा ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर निष्ठा ठेवूनच वंचित बहुजन आघाडी सोबत यापुढेही वंचित संघर्ष मोर्चा काम करेल असे जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडी माझी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत(आप्पा) तसेच सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, सातारा जिल्हा सचिव केंगार दादा, सातारा जिल्हा सुनील कदम, सातारा तालुका श्रीरंग वाघमारे, पत्रकार अनिल विरकर तसेच फलटण तालुका कार्यकारणीतील माजी पदाधिकारी सुखदेव रणदिवे, उपाध्यक्ष राहुल कांबळे, फुले शाहू आंबेडकर विद्ववत सभा अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष विजय कांबळे, संघटक विजय जयशिंग काकडे.,अमीत गायकवाड, सुर्यकांत कांबळे, रोहित गायकवाड युवा संघटक कनैय्या रिटे, फलटण तालुका उपाध्यक्ष गौतम मोहिते, समर्थ मोरे,फलटण तालुका कार्याध्यक्ष दिनकर जगताप, विकास मोरे, फलटण शहर सचिव उमेश कांबळे, महीला आघाडी चित्रा ताई गायकवाड, माया ताई मोहिते, नाना रनदिवे, अमोल लोंढे, जीवन पवार व इतर मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!