
दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त दौलतनगर, मरळी ता. पाटण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसीलदार रमेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक दीपक कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
सर्वरोग निदान शिबीराचा पाटण तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीरामध्ये स्त्री रोग, कान, नाक, घसा, रक्त व लघवी तपासणी, 18 वर्षावरील सर्व मातांची तपासणी, नेत्ररोग, क्षकिरण, अस्थिरोग, ई.सी.जी तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये आयुष्यमान भारत हेल्थ अकौंटची नोंदणी तसेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्डची नोंदही करण्यात आली. यामध्ये 160 नागरिकांची नोंदणी करण्यात आली.