
दैनिक स्थैर्य | दि. १३ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत व आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र निंभोरे यांच्याद्वारे मोफत असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
हा उपक्रम डॉ. निखिल डीघे, तालुका आरोग्य अधिकारी फलटण, डॉ. शैलजा कदम, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र निंभोरे, डॉ. संतोष कोंडके, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी तसेच सौ. रेश्मा ढेंबरे, सरपंच वडजल, श्री. योगेश पिसाळ उपसरंच वडजल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व पोलिस पाटील वडजल यांच्या उपस्थितीत पार पडला.
या शिबिरामध्ये रोगसंबंधीच्या रक्ताच्या विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये एकूण ३० पुरुष आणि १६ महिलांची तपासणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे तसेच डॉ. ए. आर. पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या निकिता आल्हाट, निकम अंकिता, मुळीक प्राजक्ता, भोसले श्वेता, भोसले श्रावणी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.