
दैनिक स्थैर्य | दि. 17 एप्रिल 2025 | फलटण | भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत. येणाऱ्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व मंडल अध्यक्ष बदल होणार आहेत. यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष पद हे फलटणला जयकुमार शिंदे यांच्याकडे येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यासोबतच फलटण येथे दोन तालुकाध्यक्ष आहेत. येणाऱ्या काळामध्ये दोन्ही तालुकाध्यक्ष बदलले जाणार आहेत, त्यामध्ये नक्की आता कुणाला संधी मिळणार हे आता बघावे लागणार आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये संघटनात्मक बदल होत आहेत. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांची बदल होणार आहेत. त्यामध्ये फलटणला जिल्हाध्यक्ष पद येणार का ? यासोबतच फलटणला तालुकाध्यक्ष नक्की कोणाला मिळणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
भाजपा जुन्या, नव्यांची सांगड कशी घालणार ?
गत काही महिन्यांपासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण शहरासह तालुक्यातील अनेक मान्यवर, नेते व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये पदाधिकारी निवड करताना भारतीय जनता पार्टी जुन्या, नव्यांमध्ये सांगड कशी घालणार ? याकडे सुद्धा आता लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये ज्यांनी पाहिल्यासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत ज्यांनी काम केले आहे, अश्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार का ? नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणार ? यांची उत्तुस्कता आता आहे.
यामध्ये जुन्या व नव्या सर्वच कार्यकर्त्यांनी निवडीबाबतचे सर्व अधिकारी हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.