दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनरल ॲटोमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
बैठकीत जनरल ॲटोमिक कंपनीचे भारतात विस्तारीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आण्विक ऊर्जा आणि ड्रोन या विषयांमध्येही जनरल ॲटोमिकने जागतिक स्तरावर राबविलेल्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.