स्थैर्य, पाचवड, दि. १५ : सह्याद्रीच्या डोंगर रांगात अनेक रहस्य दडलेली आहेत. काही रहस्य युगेयुगे उलगडली नाहीत.पूर्वीच्या काळी मानव कसा जंगलात, गुहेत रहात होता.याचे इतिहासात आपण वाचन करतो ऐकतो. पण वाई तालुक्यातील पांडवगडाच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या वाघमाळ (रेणुसेवस्ती) येथे डोंगर उतारावर दोन प्राचीन बौध्दकालीन लेण्यांचा शोध लागलेला आहे. या लण्याचा शोध घेण्यासाठी भटकंती सह्याद्रीची परिवरच्या मावळ्यांनी मेहनत घेतली. त्यांनी पुरातत्व विभागाशी संपर्क साधला आहे.
सातारा जिह्यात सुमारे 25 गड आहेत. त्यातील काही गड हे दुर्लक्षीत आहेत. अनेक डोंगर कपारित निर्सगाची रहस्य सापडतात. वाईतील भटकंती सह्याद्रीची परिवाराच्या दोन मावळ्यांनी ऐतिहासिक शोध घेण्यासाठी सकाळी बाहेर पडले. पांडवगडाच्या डोंगर चढायला सुरुवात केली. पावसात भिजलेली वाट आणि काटय़ाकुठे तुडवत दुपारी दीड वाजता त्यांना यश आले.दुपारी दीड वाजता डोंगराच्या कपारीत कोरीव लेणी दृष्टीस पडली.मग आणखी उत्सुकता लागून राहिली.पुढे आणखी लेण्या सापडल्या.त्यांनी लेण्यांची मोजमापे घेतली.त्यांनी या लेण्याबद्दल पुरातत्व विभागाला माहिती दिली आहे.मात्र, या लेण्या सापडल्याने आणखी उत्सुकता लागून राहिली आहे.
या लेण्यांचा सातारा गॅझेटमध्ये उल्लेख ..वाई येथील पांडवगडाच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या वाघमाळ (रेणुसेवस्ती) येथे डोंगर उतारावर दोन प्राचीन बौध्दकालीन लेण्यांचा शोध लागलेला आहे. हे लेणीसमूह दुस्रया किंवा तिस्रया शतकात कोरले गेले असण्याची शक्यता आहे. वाघमाळाच्या नैऋत्य आणि वायव्य दिशेला हे दोन लेणीसमूह असून, त्यातील नैऋत्य दिशेच्या लेणीसमूहात एकूण चार लेण्या आहेत. त्यातील तीन लेण्या डोंगरावरून येणाया पावसाच्या पाण्यामुळे गाळात पूर्णपणे मुजलेल्या आहेत. चौथ्या क्रमांकाची विहार लेणी असून यामध्ये चार भिक्खू निवासगृहे व त्यामध्ये बसण्यासाठी बाक कोरलेले आहे. तसेच लेणीच्या मधोमध चौकोनात एक बाक कोरलेला आहे. वायव्य दिशेच्या लेण्यांमध्ये एक पाण्याची पोढी (टाकं), आठ भिक्खू निवासगृह असणारे विहार असून सद्यस्थितीत या विहारात आठ फूटाचा गाळ साचलेला आहे. याच्या उजव्या बाजूला चैत्यगृह कोरलेले असून त्यात स्तूप कोरलेला आहे. याला लागूनच अजून एक चौकोनी खोली कोरलेली आहे. या लेण्यांचा सातारा गॅझेटमध्ये उल्लेख असून भारतीय पुरातत्त्व विभागाकडे नोंद याची नाही. पांडवगड परिसरात अजून काही लेण्या बुजल्या असण्याची शक्यता आहे. त्याविषयी भटकंती सह्याद्रीची परिवाराच्या शोधमोहिमा चालू आहेत.