
दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून येत्या बुधवार दि २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी चार वाजता सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांचे *वारकरी संतांची परंपरा व प्रबोधन* या विषयावर प्रवचन आयोजित केले आहे अशी माहिती कार्यवाह विजय मांडके व खजिनदार मदनलाल देवी यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ सातारच्या राजवाड्याजवळील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) उद्यानातील सभागृहात बुधवार दि २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हे प्रवचन होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रवचन होईल.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून शिवाजी राऊत यांचे प्रवचन आयोजित केले आहे. शिवाजी राऊत यांनी चौफेर लेखन केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक , माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते , जेष्ठ विचारवंत , पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते असलेल्या शिवाजी राऊत यांनी कॉलम ऑफ थॉट , शिक्षा नीती आदी पुस्तके लिहिली आहेत. उस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्रातील पहिल्या साखर शाळेचे शिक्षक असलेल्या शिवाजी राऊत यांचे प्रवचन ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष श्रीमती ज्योती मोहिते व भिकाजीराव सूर्यवंशी यांनी केले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्यवाह अशोक कानेटकर यांनी केले आहे.