दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । आर्थिक दुर्बल व मागासवर्गीयांसाठी असणार्या या योजना संबंधित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे शासनाने त्वरित बंद कराव्यात, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते हरिष काकडे यांनी व्यक्त केली.
फलटणमध्ये मंगळवार पेठ येथील किरण काकडे या 23 वर्षिय युवकाचा मृत्यू केवळ आर्थिक कुमकवत आसल्याने झालेला आहे. महात्मा फुले जीवनदायी योजना तसेच दहा टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षित कॉट या लोकांपर्यंत पोहोचले जात नाही. त्यामुळे केवळ या योजना राबवत असणारे हॉस्पिटल व डॉक्टर हे या युवकाच्या मृत्युस कारणीभूत आहेत. या योजना जे हॉस्पिटल राबवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून व त्यांच्या मान्यता रद्द करुन फलटण मधून या योजना त्वरित बंद करण्यात याव्यात यामध्ये फक्त हॉस्पिटल व डॉक्टरांचा वैयक्तिक आर्थिक फायदा आहे.
या योजना मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ज्यावेळेस पेशंट दवाखान्यात ऍडमिशन घेतो. त्यावेळेस या दवाखान्यातून पहिल्यांदा दहा किंवा वीस हजार रुपये डिपॉझिट स्वरूपात घेतले जातात. आणि आणि नंतर त्या पेशंटला या योजनेत बसवले जाते. पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांची अगोदर आर्थिक पिळवणूक केली जाते. आणि नंतर त्या पेशंटला या योजनेत बसवले जाते. त्याचा फायदा फक्त केवळ वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी डॉक्टर करतात. म्हणून या योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी न पोचल्यामुळे त्या पेशंटचा मृत्यू होतो. म्हणुन या योजना आर्थिक दुर्बल व्यक्तींना न पोचल्यामुळे फक्त डॉक्टरांच्या फायद्यापुरत्याच आहेत. म्हणून या योजना त्वरित बंद करण्यात यावेत.
साथीचे रोग येत असतात. नगरपालीका प्रशासन त्यांचे काम करत असते. सफाई कर्मचारी हे मागासवर्गीयच आहेत त्यांची जबाबदारी नगरपालीका घेत असते. आपणही सामाजिक बांधीलकीतुन या कर्मचार्यांच्या आरोग्याचा विचार करणे तेव्हढेच आवश्यक आहे. शासनाच्या योजना आर्थिक दुर्बल लोकांना मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी दहा टक्के मागासवर्गिय आरक्षित खाटा व महात्मा फुले जिवनदायी योजना फलटण मध्ये योग्य व प्रामाणिक रित्या चालु आसणे गरजेचे वाटते. ते डॉक्टर आपल्या हॉस्पिटल मध्ये या योजना योग्य पध्दतीने राबवित नसतील तर. त्या हॉस्पिटलची मान्याता रद्द करुन त्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा हा मोर्चा डॉक्टरांच्या घरावर नेण्यात येईल. याची दखल घ्यावी.