
दैनिक स्थैर्य । 8 जुलै 2025 । सातारा । किसन वीर कारखान्यामधील मागील व्यवस्थापनाच्या काळामध्ये शेतकरी व कर्मचार्यांना जो मनस्ताप होऊन गळचेपी झाली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या मनामध्ये कारखान्याची प्रतिमा मलीन झालेली होती. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षामध्ये कोणत्याही बँकेचे अर्थसहाय्य न घेता शेतकर्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिल्याने शेतकर्यांच्या मनामध्ये असलेली किसन वीरची प्रतिमा सहकारातील शिस्तीमुळे उजळ झाली असल्याचे प्रतिपादन, खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 चे मिल रोलर पुजन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार नितीनकाका पाटील व त्याच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिमा नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, 2022 मध्ये कारखान्याची सुत्रे नामदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने स्विकारली. त्यावेळी भाग भांडवल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. त्यावेळी काहींनी आमच्या पाठीमागे निंदा नालस्ती केलेली होती. परंतु शेतकर्यांचे कारखान्यावरील असलेल्या प्रेमापोटी शेतकन्यांनी कर्जातील कारखान्यास भागभांडवल देऊन कारखान्यास जीवनदान दिले व नामदार मकरंदआबांच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवला. नामदार मकरंदआबांच्या प्रयत्नामुळे एनसीडीसीकडून दोन कारखान्यांसाठी 467 कोटीची रकम मिळालेली होती. सदरची रकम ही फक्त कारखान्यावरील कर्ज भागविण्यासाठीच वापरले असून काही बँकांच्या रक्कम देय्य आहेत. मागील तीन वर्षामध्ये एकाही बँकेचे अर्थसहाय्य न घेता आमच्या व्यवस्थापनाने इतर कारखान्यांप्रमाणे दर देत शेतकर्यांची व इतर देणी दिली आहेत. मागील तीन वर्षामध्ये शेतकर्यांना व्यवस्थित दर मिळाल्याने तेही समाधानी असून त्यांनाही आता किसन वीरबाबत शाश्वती निर्माण झालेली आहे. सन 2025-26 च्या गळित हंगामात किसन वीर कारखान्याने 8 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवलेले आहे. हे उद्दिष्ठ पुर्ण करण्यासाठी कार्यकरते, शेतकरी व कर्मचार्यांने आपला व आपल्या परिसरातील संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याकडेच गळितासाठी येण्यासाठी सर्वाना प्रेरित करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. येणारे तीन हंगामाचे गाळप पुर्ण क्षमतेने झाल्यास शेतकरी व कर्मचार्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वासही यावेळी खासदार पाटील यांनी व्यक्त केला.
प्रमोद शिंदे म्हणाले, येणारा सन 2025-26 हा मोठ्या अडचणींवर मात करीत सामोरे जात आहोत. नामदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने शेतकरी व कर्मचार्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावरच मागील तीन हंगाम यशस्वी केलेले आहेत. एनसीडीसीमार्फत मिळालेली रक्कमेतुन मागील संचालक मंडळाचा काळातील सन 2020-21 मधील जवळपास 60 कोटी रूपये शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केलेले असून कामगारांचा मागील सर्व पीएफची रक्कमही जमा केलेली आहे. तसेच मागील शासकीय देणीही दिल्यामुळे कारखान्यास टॉप टॅक्स पेअरचा बहुमान मिळाला. शेतकर्यांनीही आपला पिकविलेला संपुर्ण ऊस कारखान्यास घालण्याचे आवाहनही यावेळी शिंदे यांनी केले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, हिंदुराव तरडे, रामदास इथापे,प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, दत्तानाना ढमाळ, कार्यकारी संचालक उत्तम पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, रामभाऊ लेंभे, महादेव मस्कर, आत्माराम सोनावणे, मनिष भंडारी,अरविंद कदम, बबनराव साबळे, मानसिंगराव साबळे, मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव, व्हाईस चेअरमन विनायक येवले, रमेश गायकवाड, पोपट जगताप, संजय मोहोळकर, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, मनोज पवार, अजय भोसले, श्रीमंत झांजुर्णे, अजय कदम, नितीन निकम, संभाजीराव धुमाळ, कार्यकर्ते, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,
’किसन वीर’च्या प्रोग्रॅमची प्रत लावणार ग्रामपंचायत कार्यालयात – खासदार नितीनकाका पाटील
शेतकर्यांना स्वतः तोड केंव्हा येणार याची माहिती मिळण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयात त्याची प्रत शेती विभागामार्फत लावली जाणार आहे. तसेच शेतकर्यांनी ऊस तोडीसाठी थोडा वेळ थांबणे गरजेचे असून सर्वांचे ऊस वेळेत तोडले जाणार असून शेतकर्यांनी याबाबत निश्चित राहण्याचे आवाहनही यावेळी खासदार पाटील यांनी केले आहे.