स्थैर्य, सातारा दि. 23 : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून व कोरोना केअर सेंटर मधून 10 जणांना आज 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष, बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष, निढळ येथील 24 वर्षीय महिला माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील 63 वर्षीय महिला, कोरेगांव येथील 53 वर्षीय महिला व चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष. सातारा येथील निशिगंधा कॉलनी बारवकर नगर येथील 14 व 17 वर्षीय युवती.
218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रातीसिंह नानापाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 85, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 38, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 1, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 17, शिरवळ येथील 9, रायगांव 15, पानमळेवाडी 19, मायणी 11, महाबळेश्वर 4, पाटण येथील 8 असे एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून, एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत.
मृतकाची नोंद कोविड बाधितांमध्ये
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दि. 19 जून रोजी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात घेतलेला नमुना पॉझिटिव्ह आला होता व त्याच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नव्हती वरिष्ठांकडून सूचनेनुसार या मृत्यूची नोंद कोविड बाधित मृत्यू मध्ये करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 40 कोविड बाधित मृत्यू झाले आहेत असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.