रायगांव येथील कोरोना केअर सेंटरमधील 4 जणांना डिस्चार्ज


आज दिवसभरात 23 जणांना दिला डिस्चार्ज : 184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

स्थैर्य, सातारा दि. 2 : कोरोना केअर सेंटर, रायगांव  येथे दाखल असणारे 4 जण कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.

यामध्ये सातारा तालुक्यातील प्रतापगंजपेठ येथील 42 व 44 वर्षीय पुरुष,  कोरेगांव तालुक्यातील कुमठे येथील 32 वर्षीय पुरुष व चंचळी येथील 29 वर्षीय पुरुष असे 4 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 11, खावली कोरोना केअर सेंटर येथील  8 व रायगांव येथील 4 असे एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत विविध ठिकाणावरून आता पर्यंत 223 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 25, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 52, कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 58, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 7, खंडाळा येथील 33 व कोरेगांव येथील 9 असे एकूण 184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!