खावली कोरोना केअर सेंटर मधून आज 2 जणांना डिस्चार्ज


मृत्यू पश्चात 2 नागरिकांसह 131 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्थैर्य, सातारा दि. 31 : कोरोना केअर सेंटर, खावली येथे दाखल असणाऱ्या खटाव तालुक्यातील  निमसोड येथील 20 वर्षीय युवक व 48 वर्षीय पुरुष असे 2 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे पुसेसावळी येथील 48 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याने कोविड संशयित म्हणून नमूना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला आहे तसेच महाबळेश्वर येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या झांजवड गावातील 57 वर्षीय पुरुषाने आत्महत्या केली असून त्याचाही नमुना कोविड तपासणी करीता पाठविण्यात आला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

131 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे 9, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 36, शिरवळ येथे 52, कोरोना केअर सेंटर रायगांव येथे 15 असे एकूण 131 घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!