44 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू

स्थैर्य, सातारा दि. 2 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 44 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 306 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  तसेच वाई येथील एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये 

● खंडाळा तालुक्यातील कबुलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29, 31, 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 7 वर्षीय बालिका, तळेकरवस्ती 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष,

● सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 1 वर्षाचा बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर येथील 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला, 8 वर्षाची बालिका, शेळकेवाडी येथील 40 वर्षीय महिला, 18 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला

● माण ताललुक्यातील आंधळी येथील 65 वर्षीय महिला,

● वाई तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदूर्जणे येथील 48, 30  वर्षीय पुरुष, पसरणी येथील 65 वर्षीय महिला,

● खटाव तालुक्यातील वडूज येथील 29, 23, 24, 28 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला,

● जावली तालुक्यातील सायगांव येथील 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी येथील 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 41,  खंडाळा येथील 75, पानमळेवाडी येथील 75, मायणी येथील 28, महाबळेश्वर येथील 17, खावली येथील 50 असे एकूण 306 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

एका बाधिताचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 72 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने 29069

एकूण बाधित 4272

घरी सोडण्यात आलेले 2128

मृत्यू 139

उपचारार्थ रुग्ण 2005


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!