स्थैर्य, सातारा दि. 15 : सातारा जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटर येथून आज 25 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, आज अखेर जिल्ह्यात 533 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 178 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कृष्णा मेडिकल हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणारे कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 49 वर्षीय महिला, तुळसण येथील 60, 50, 26 व 65 वर्षीय महिला तर 26 व 30 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील कोर्टी येथील 45 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष असे एकूण 9 रुग्ण. बेल एअर पाचगणी येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील कावडी येथील 18 व 47 वर्षीय पुरुष आणि 58 वर्षीय महिला व 15 वर्षाची मुलगी असे एकूण 4 रुग्ण. फलटण कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 38 व 25 वर्षीय महिला, जोरगांव येथील 21 व 12 वर्षीय तरुण असे एकूण 4 रुग्ण. पाटण कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱ्या आडदेव ता. पाटण येथील 25 वर्षीय तरुण. वाई कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱ्या धावडी ता. वाई येथील 48 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय पुरुष असे एकूण 2 रुग्ण. ब्रम्हपूरी कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱ्या ता. कोरेगांवचे पिम्पोडे येथील 53 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला असे एकूण 3 रुग्ण. मायणी मेडिकल कॉलेज कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणाऱ्या खटाव तालुक्यातील कलेढोण येथील 42 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला असे एकूण 2 रुग्ण.
तसेच काल रात्री उशिरा एन. सी. सी.एस. पुणे यांचेकडून 134 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 745 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 533 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 178 इतकी झाली आहे तर 34 जणांचा मृत्यु झालेला आहे.