अरुणाचलमधून बेपत्ता झालेले तरुण परतले:12 व्या दिवशी अरुणाचल प्रदेशातील 5 तरुणांना चीनी सैन्याने भारताकडे सोपवले, 14 दिवसांसाठी करण्यात आले क्वारंटाइन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१२: अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले पाचही भारतीय नागरिक चीनी सैन्याने भारतीय सैन्याकडे सोपवले आहेत. 12 दिवसांनंतर ते परतले आहेत. सैन्याने सांगितले की, हँडओव्हरची ही कारवाई किबिधू सीमेवर झाली. जवळपास एक तास कागदपत्रांची कारवाई सुरू होती. आता यांना कोरोना प्रोटोकॉलनुसार 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल.

1 सप्टेंबरला हे तरुण बेपत्ता झाले होते


हे पाचही तरुण 1 सप्टेंबरला बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. 6 सप्टेंबरला भारतीय सेनाने हॉटलाइनच्या माध्यमातून संपर्क केला आणि यांच्याविषयी माहिती मागितली. 8 सप्टेंबरला हॉटलाइनवर चीनने हे युवत त्यांच्या सीमेत असल्याचे स्पष्ट केले. नंतर भारताने चीनकडून डिप्लोमॅटिक आणि सैन्यांच्या माध्यमातून या तरुणांना पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

LRRP दलासोबत पोर्टर्सचे काम करत होते तरुण


पाचही तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, हे लोक मॅकमोहन लाइनची पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांना म्हणजेच लॉन्ग रेंज रिकॉन्सन्स पेट्रोलसाठी आवश्यक साहित्य पोहोचवण्याचे काम करत होते. पोर्टर्स म्हणून यांना देखरेख करणाऱ्या दला सामिल करण्यात आले होते. यांचे वय 18 ते 20 वर्षांच्या जवळपास आहे. यांच्या कुटुंबीयांना शंका होती की, ते तरुण पर्वतांवर पारंपारिक औषधी शोधत असताना देखरेख दलापासून वेगळे होऊन भरकटले असतील.

अरुणाचलच्या आमदाराने दावा केला होता की, चीनने पाच मुलांचे अपहरण केले


ज्यावेळी 5 सप्टेंबरला अरुणाचलचे काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिंग यांनी ट्विटरवर चीनी सैन्याने पाच भारतीय मुलांचे अपहरण केल्याचा दावा केला. राज्याचे कॉंग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनीही ट्विटरवर अपहरण झालेल्या मुलांची नावे दिली होती. एरिंग म्हणाले होते – ‘चिनी सैनिकांनी नाछो शहरात राहणाऱ्या पाच मुलांना पळवून नेले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेत असताना ही घटना घडली. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए किंवा चायना आर्मी) च्या या कृतीतून खूप चुकीचा संदेश जाईल. चीनला योग्य उत्तर अवश्य द्यायला हवे.’

हे मुलं तागिन समुदायाचे आहेत. एरिंग यांच्या दाव्यानुसार, चीनी सैनिकांनी यांना नाछो क्षेत्राच्या जंगलांमध्ये उचलले होते. हे क्षेत्र सुबानसिरी जिल्ह्यात येते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!