दिव्यांग बांधव टाकणार निवडणुकांवर बहिष्कार


स्थैर्य, सातारा, दि. 26 नोव्हेंबर : दिव्यांगांना पेन्शनवेळेवर मिळत नसून पालिकेने त्यांना एकही रुपया करामध्ये सूट मिळाली नाही. राजकीय आरक्षण नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, यासह अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने दिव्यांग बांधव नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत 1. मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने प्रांताधिकारी अजय बारकुले यांना निवेदनाद्वारे दिला.

दिव्यांगाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कोणता नेता किंवा व्यक्ती येत नाही. अडीच हजारांमध्ये दिव्यांगाचा उदरनिर्वाह चालत नाही. आता दीड हजारच पेन्शन जमा झाली आहे. एकही आमदार दिव्यांगांसाठी निधी खर्च करत नाही. पोलिस ठाण्यात दिव्यांगांवर खोटे गुन्हे दाखलकरत आहेत. खेळाडूंप्रमाणे राजकीय आरक्षण मिळावे. व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे. बसस्थानक, रेल्वे स्थानकात व्यवसायासाठी मोफत स्टॉल मिळावेत, अशा मागण्यांसाठी दिव्यांगांनी निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, बाळासाहेब खोत व इतर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!