दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा । भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेत (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिष्यवृत्ती राबविण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी 2022-23 या वर्षासाठी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, उच्च महाविद्यलयांचे विभाग प्रमुखांनी त्यांच्या शाळेतील सर्व प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचे मुदतीत अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करावी, असेही श्रीमती घोळवे यांनी कळविले आहे.