दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । नियोजन विभाग अंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्याकडून राष्ट्रीय नमुना पाहिणीच्या 79 व्या फेरीची विभागस्तरीय कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पाहणी विषय Comprehensive Annual Moufular Survey (CAMS) आणि आयुष पध्दतीबाबत सर्वेक्षण असून या विषयावर विस्तृत माहिती संकलित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी तृप्ती निंबाळकर यांनी दिली आहे.
ही पाहणी जुलै 2022 ते जून 2023 या दरम्यान घेण्यात येणार आहे. या पाहणीत CAMS अंतर्गत शाश्वत विकास ध्येय निर्देशक तयार करण्याच्या उद्देशाने आवश्यक प्राथमिक माहिती गोळा केली जाणार आहे. या पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवर विविध धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जातो. ही माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे पाहणीसाठी ज्या कुटुंबाची निवड केली जाणार आहे त्यांनी सखोल व विश्वासार्ह माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा सांख्यिकी अधिकारी तृप्ती निंबाळकर यांनी केले आहे.