
स्थैर्य, फलटण, दि.३: फलटण तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ, संत ज्ञानेश्वर गोपालन व संशोधन संस्था, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे संचालक प्रकाश नामदेव जठार यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पकालीन आजाराने नुकतेच निधन झाले.
युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर यांचे विचार व आदर्शावर श्रद्धा असलेले त्यांचे अनुयायी म्हणून सर्व परिचित असलेले प्रकाश जठार नुकतेच सार्वजनिक बांधकाम खात्यातून सेवानिवृत्त झाले होते, गावातील महादेव मंदिरात प्रति वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा पारायण सोहळ्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. तालुक्यातील कोणत्याही धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ते प्रयत्नशील असत.
प्रकाश जठार महाराज यांच्या आकस्मित जाण्याने फलटण वारकरी सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.