
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा पालिकेत नुकत्याच झालेल्या चतुर्थ वार्षिक पाहणीनंतर घरपट्टीच्या नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही प्रक्रिया अपील दाखल करण्याच्या टप्प्यात असताना ही प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याच्या सूचना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्या आहेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घरपट्टी प्रक्रिया तातडीने थांबवावी या संदर्भात निवेदन सादर करून नगर विकास विभागाच्या माध्यमातून हस्तक्षेप करण्याची सूतोवाच केले होते त्यानुसार ही प्रक्रिया थांबवली जाणार असल्याची चिन्हे आहेत
सातारा पालिकेत नागरिकांनी आपिलांची प्रक्रिया पूर्ण करावी हरकतींवर सुनावणी निवडणूक प्रक्रियेनंतर सर्वसाधारण सभा अस्तित्वात आल्यानंतर घेतल्या जातील असे स्पष्ट संकेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले आहेत . चतुर्थ वार्षिक पाहणी झाल्यानंतर सातारा शहरातील 72 हजार मिळकतींना घरपट्टीच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मात्र प्रशासक राज सातारा पालिकेत असताना नागरिकांना घरपट्टीचे विरोधात अपील करावयाचे झाल्यास तांत्रिक कारणामुळे अपिलय समिती अस्तित्वात नाही त्यामुळे लागू होणारी अपिले आणि त्यावर होणारी सुनावणी ही कायदेशीर दृष्ट्या वैध नसणार या हेतूने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन त्यांना घरपट्टीच्या नोटिसा वाटप करण्याची प्रक्रिया थांबवण्याचे निवेदन सादर केले होते आणि पत्रकारांशी बोलताना या प्रक्रियेमध्ये नगर विकास विभागाकडून हस्तक्षेप करण्याचे संकेत दिले होते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दूरध्वनीवरून घरपट्टी प्रक्रिया थांबवण्याचे तातडीने निर्देश दिले
दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घातला बुधवारी विलासपूर गोडोली येथील समाज मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिक्रिया देताना घरपट्टी प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची प्रतिक्रिया स्वतः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली होती मुख्याधिकारी व प्रशासक अभिजीत बापट यांना या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा या माहितीला दुजोरा दिला . आतापर्यंत सातारा पालिकेकडे घरपट्टीच्या संदर्भाने सहा हजार एकशे पन्नास अपिले दाखल झाली आहेत ही अपिले दाखल करून घेण्यात येतील त्यानंतर पुढील पालिका निवडणुका सर्वसाधारण सभा अस्तित्वात आल्यानंतर या अपीलांवर सुनावणी घेण्यात येईल असे बापट यांनी स्पष्ट केले