गायीच्या पारंपारिक पूजनाने साताऱ्यात दीपोत्सवास सुरवात; सातारकरांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | ऐतिहासिक शाहूनगरीत वसुबारसच्या निमित्ताने येथील पंचपाळे हौद येथे गोधनाचे पारंपारिक पध्दतीने पूजन करण्यात आले . वसुबारसच्या पूजेने साताऱ्यात दीपोत्सवाचा अर्थ त दिवाळीचा जल्लोष सुरू झाला असून सातारकरांचा सुध्दा दिवाळी खरेदीचा उत्साह उतू जाऊ लागला आहे . राजपथासह वर्दळीच्या मोती चौकाला आज जत्रेचे स्वरूप आले होते.

वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सण वसुबारसने सोमवारपासून सुरू झाला. पंचपाळे हौद ट्रस्टच्या वतीने सायंकाळी दुर्गा माता मंदिर परिसरात सुमारे पन्नास गोधनांच्या पारंपारिक पूजनाचे आयोजन केले होते. हिंदू धर्मशास्त्रात धनधान्य व दुग्ध समृध्दीसाठी नंदा कामधेनूचे मोठे महत्व आहे. साताऱ्यात सुवासिनींनी पंचपाळे हौद परिसरात गायींची मनोभावे पूजा केली. यावेळी मंदिर परिसरात पण त्या लावल्याने सर्व परिसर झळाळला होता. यंदा रमा एकादशी व गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आल्या. द्वादशीचा मुहूर्त दुपारी दीड वाजता असला तरी धेनूंचे सायंकाळीच पूजन करण्यात आले. गोमातेला हळदी कुंकू वाहून सुवासिनींनी घरात समृद्धी नांदू दे असे मनोभावे साकडे घातले. दीपोत्सवाची सुरवात होते आहे. अंगणात शेणाचा सडा मारून पहिली रांगोळी काढण्याचा, गाय-वासराला ओवाळण्याचा हा दिवस. त्यानंतर पुढील पाच . दिवस हा सण उत्साह, जल्लोष आणि आनंदाने साजरा केला जाणार आहे.

साताऱ्यात दिवाळीच्या तयारीची धामधूम आता शेवटच्या टप्प्यात आहे. फराळ बनवणे, कपड्यांची खरेदी, सजावट साहित्य, घरांची रंगरंगोटी आवरत आले आहे. मंगळवारी ( दि 2) धनत्रयोदशी, गुरूवारी ( दि 3 )नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आहेत . शुक्रवारी ( दि4, कार्तिक शुद एकादशीला दीवाळी पाडवा आहे . शनिवारी दि 6 रोजी भाऊबीजेने दिपोत्सवाची सांगता होणार आहे .पाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदीचा धूमधडाका असेल. सोन्या-चांदीपासून वाहन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स, घर खरेदीची धामधूम असेल. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून पै-पाहुणे एकमेकांकडे गेले नाहीत. भाऊबिजेच्या निमित्ताने त्यालाही मुहूर्त लाभेल.

साताऱ्यात करोनाचे अरिष्ट अगदीच नियंत्रणात असल्याने राजपथांसह शहराची बाजारपेठ गर्दीने फुलली असून मंदीच्या दुष्टचक्रातून अर्थकारण बाहेर पडतेय याची झलक पहायला मिळाली . देवी चौक ते मोती चौक ते राधिक चौक या काटकोन परिसरात खरेदीदारांची प्रचंड गर्दी झाल्याने रस्त्यावर पायी चालणे अवघड झाले असून वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे . साताऱ्याचा संपूर्ण परिसर . विद्युत रोषणाईने उजळून गेला असून पर्यावरणाशी संतुलन राखणाऱ्या ग्रीन फटाक्यांनी शहराचा आसमंत प्रकाशमान होत आहे


Back to top button
Don`t copy text!