“स्थैर्य”च्या माध्यमातून दिपक चव्हाण यांची विशेष मुलाखत : स्पष्ट केली राजे गटाची पुढील रणनीती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण | दैनिक “स्थैर्य”चे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपक चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत दिपक चव्हाण यांनी राजे गटाच्या आगामी भूमिकेबाबत स्पष्ट माहिती दिली आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत राजे गटाची तयारी आणि रणनीती समोर आणली.

दिपक चव्हाण यांनी स्पष्ट केले की; राजे गट आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजे गटाचे कार्यकर्ते आणि नेते एकजुटीने काम करून निवडणुकीचा सामना करणार आहेत. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती दिली.

या मुलाखतीत दिपक चव्हाण यांनी जे कार्यकर्ते राजे गट सोडून जात आहेत त्यांना सज्जड इशारा दिला. त्यांनी सांगितले की राजे गट हा एक मजबूत आणि एकजुट गट आहे आणि अशा कार्यकर्त्यांनी गटाच्या एकतेचा विचार करूनच पावले उचलावीत.

दिपक चव्हाण यांनी निवडणुकीच्या तयारीबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की राजे गटाचे नेते आणि कार्यकर्ते ग्रामीण आणि शहरी भागात जाऊन लोकांच्या समस्या समजून घेत आहेत आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. यामुळे लोकांचा राजे गटावर असणारा विश्वास वाढेल आणि येणाऱ्या निवडणुकीत यश मिळेल.

दिपक चव्हाण यांची ही विशेष मुलाखत दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता दैनिक “स्थैर्य”च्या युट्युब चॅनेल द्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!