दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । सातारा । महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दौलतनगर, मरळी, ता. पाटण येथे भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला.
या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुनील गाडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर गोल रिंगण, कीर्तन व महाप्रसाद या प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाला.