महाराष्ट्र व कर्नाटक मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालक पदी दिलीप भोसले बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । फलटण । महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालक पदी सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीप भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या महाराजा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना दिलीप भोसले यांनी 2010 साली केली. संस्थेच्या आठ शाखा असून सातारा, पुणे व सोलापूर या जिल्ह्यात संस्था कार्यरत आहेत.

या संस्थेची वार्षिक उलाढाल 404 कोटी 28 लाख 54 हजार रुपये आहे. नफा 1 कोटी 27 लाख आहे. शून्य टक्के एनपीए, शून्य टक्के येणे व्याज, शून्य टक्के थकबाकी राखण्यात या संस्थेला यश प्राप्त झालेले आहे. तसेच या संस्थेस सलग तीन वेळा नॅशनल अवार्ड मिळालेला आहे. संस्थेचे कामकाज पाहता फेडरेशनने संचालक पदासाठी दिलीप भोसले यांची शिफारस करून संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पुणे येथे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. दिलीप भोसले यांच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फेडरेशनचे विद्यमान चेअरमन सुरेश वाबळे, व्हाईस प्रा. अक्कलकोटे पाटील यांच्यासह सहकार, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!