
दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । फलटण । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांसह कोळकी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. कोळकीच्या सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले आणि उपसरपंच डॉ. अशोक नाळे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यानंतर ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे, गणेश शिंदे, अक्षय गायकवाड, शिवाजी भुजबळ आणि पोलीस पाटील मकरंद पखाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या जयंती उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, कोळकी येथील ‘आजी-माजी सैनिक संघटने’च्या महार रेजिमेंटमधील जवानांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मानवंदना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अबिद खान (पठाण), बाळासाहेब काशीद, संदीप नेवसे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्ता नाळे, विक्रम पखाले, ॲड. संदीप कांबळे, दिलीप (काका) लोंढे, भरत भोसले, सिकंदर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोळकी येथील महिला, पुरुष, युवक आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, कोळकी’ आणि ‘राजन खिलारे मित्रपरिवार’ यांनी केले.