दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । बारामती । शासनाचे सहकार क्षेत्रात बदलते धोरण, वसुलीचे धोरण, सहकार संस्थेतील कर्ज वितरण व अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर आदी साठी पत संस्था संचालक व सेवक वर्ग यांनी सजग असावे म्हणून आर्थिक साक्षरता अभियान साठी पत संस्थेचा पुढाकार महत्वाचा असलेचे प्रतिपादन बारामती तालुका सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी केले.
शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था व बारामती तालुका सहकारी फेडरेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने नागरी, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था यांची मासिक आढावा सभा व आर्थिक साक्षरता अभियान व नियामक मंडळ कामकाज या विषयावर सहकार तज्ञ प्राध्यापक महेंद्र खरात यांचे व्याख्यान चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मिलिंद टांकसाळे बोलत होते.
या वेळी बारामती तालुका फेडरेशन चे अध्यक्ष तानाजीराव कर्चे, सहायक निबंधक कार्यालय अधिकारी शुभांगी गोलांडे,प्रा महेंद्र खरात, फेडरेशन सचिव बापूसाहेब गोरवे व व पतसंस्था संचालक व सेवक वर्ग उपस्तित होते.
बदलते शासन व बदलते सहकारातील कायदे, पतसंस्था दर्जा, वसुली, कर्ज वाटप आदी बाबत प्रा. महेंद्र खरात यांनी मार्गदर्शन करून
पत संस्थाचालक यांच्या शंकाचे निरसन केले. बारामती तालुक्यात 190 पतसंस्था असून 25000 कोटी च्या ठेवी असून जवळपास दोन हजार कोटी चे कर्ज वितरण केले आहे पतसंस्था क्षेत्रात क्षेत्रात बारामती तालुका फेडरेशन उत्तम रित्या काम करत असल्याचे अध्यक्ष तानाजीराव कर्चे यांनी सांगितले. अनिल सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन केले. उप्स्तीतचे आभार बापूसाहेब गोरवे यांनी मानले