दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२२ । मुंबई । रेवफिन या नवीन युगाच्या वंचित आणि सेवा नसलेल्या क्षेत्रातील डिजिटल इ-मोबिलिटी ग्राहक कर्ज व्यासपीठाने अलीकडेच १०० कोटी रूपयांची रक्कम कर्जाच्या स्वरूपात उभारली आहे. नॉर्दर्न आर्क, लिक्विलोन्स, यूके चॅरिटी शेल फाऊंडेशन आणि इतरांच्या नेतृत्वाखालील वित्तपुरवठा फेरीमुळे रेवफिनला आसाम, एमपी, राजस्थान आणि पंजाब अशा नवीन राज्यांमध्ये ई-रिक्षा वित्तपुरवठा व्यवसाय विस्तारित करण्यास मदत होईल.
या दिल्लीस्थित कंपनीची योजना उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि झारखंड येथील विद्यमान बाजाराच्या २० टक्के वाटा घेण्याची आहे. या निधीमुळे देशातील बँकिंग नसलेल्या आणि वंचित क्षेत्रांना ईव्ही उपाययोजनांचा अंगीकार वेगाने करण्यास मदत होईल. रेवफिनकडून या भांडवलाचा वापर इ-वाणिज्य डिलिव्हरीसाठी दुचाकीचा वित्तपुरवठा आणि भाडेतत्त्वावर देण्याच्या क्षेत्रात केला जाईल.
रेवफिनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अग्रवाल म्हणाले की, “निधीचा नव्याने आंतरप्रवाह झाल्यामुळे आम्हाला रचनात्मक पद्धतीने ईव्ही वित्तपुरवठ्याच्या क्षेत्रातील विविध अडथळे दूर करण्यासाठी आणि रेवफिनला भारतातील बाजारातील आघाडीचा ईव्ही वित्तपुरवठादार होण्यास मदत होईल. मासिक वितरणात ५ पटींपेक्षा जास्त वाढीचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही मोठ्या ई-रिक्षा ओईएमसोबत भागीदारी केली आहे आणि आमची नवीन समभाग वाढ आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.”
नॉर्दर्न आर्क कॅपिटलचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी बामा बालकृष्णन म्हणाले की, “नॉर्दर्न आर्कने कायमच आपल्या भागीदारीच्या माध्यमातून शाश्वत परिणाम साध्य करण्यावर विश्वास ठेवला आहे. आम्हाला वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रात रेवफिनसोबत भागीदारी करताना आनंद होत आहे, कारण त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होईल आणि शाश्वत विकास साध्य करता येईल.”