दैनिक स्थैर्य | दि. १५ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फॉर माय भारत/युथ फॉर ‘डिजिटल लिटरसी’ या घोषवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२४-२५ तरडगाव, तालुका फलटण, जि. सातारा येथील समाज प्रबोधन व्याख्यान मालिकेतील कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सचिन लामकाने यांनी ‘डिजिटल लिटरसी’ हा आधुनिक काळातील युवकांद्वारे जनजागृती कार्यक्रम असे उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. जी. बी. अडसूळ, सहायक प्राध्यापक, कृषी विस्तार शिक्षण, कृषी महाविद्यालय, फलटण हे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना ‘डिजिटल लिटरसी’ संकल्पना, पार्श्वभुमी व डिजिटल इंडियाअंतर्गत येणारे विविध उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती कृषि महाविद्यालयाचे प्रा. महेश बिचुकले यांनी दिली.
प्रमुख वक्ते प्रा. सचिन लामकाने यांनी उपस्थितांना संबोधित करताना डिजिटल लिटरसीचे उदिष्टे, युवकांचे डिजिटल भारत बळकटीकरणासाठी योगदान, आत्मनिर्भर भारत, युवकांचे डिजिटल लिटरसी जनजागृती करण्यासाठी द्यावयाचे योगदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. जी. बी. अडसूळ यांनी डिजिटल लिटरसीचे कृषि क्षेत्रासाठी असणारे महत्व, युवकांनी शेतकर्यामध्ये डिजिटल लिटरसी वाढवण्यासाठी करावयाचे योगदान, डिजिटल लिटरसी अवलंब करताना येणार्या अडचणी यावर उपस्थितांना संबोधित केले.
श्री. संतोष कुंभार, मा. ग्रामपंचायत सदस्य, तरडगाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डिजिटल लिटरसीचे जनजागृती करताना सामाजिक माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत व युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डिजिटल लिटरसी समाजामध्ये वाढवण्यात यावे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला श्री. महावीर शहा, व्हाईस चेअरमन, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, तरडगाव, तरडगाव गावचे माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे व स्वयंसेवक उपस्थित होते.
सूत्रसंचालन कुमार रोहन दंडे व कुमारी श्वेता झेंडे आणि आभार कुमारी सेजल साळवे हिने व्यक्त केले.