दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | रेव्हफिन हा एक अद्ययावत डिजिटल ई वेगवान वित्त पुरवठा प्लेटफॉर्म असून तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत व वित्तीय सेवांपासून वंचित वर्गांचे वित्तपोषण करतो. रेव्हफिनने नुकतेच प्री-सीरिज ए फंडिंग राऊंडमध्ये इक्विटी आणि कर्ज या दोन्हींत ४ दशलक्ष डॉलर्सच्या निधीची उभारणी केली आहे. हा फंड देशातील अल्प उत्पन्न ग्राहकांमध्ये ईव्ही वाहनांच्या स्वीकार्हतेला चालना देतो. कर्ज वाटपात वाढ करण्याच्या दृष्टीने या फंडचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून कर्ज वितरणाचा सध्याचा रन-रेट मासिक ३ कोटी रुपयांवरून मासिक १५ कोटी रुपयांवर आणला जाणार आहे.
रेडक्लिफचे धीरज जैन, लेट्स व्हेंचर अँजल फंड, अनुराग आणि रुचिरन्स जयपुरिया (ब्रेव्हरेजेस) ऋषी कजारिया (सिरॅमिक्स) आणि राहुल सेठ (पॉवर जनरेशन) यांच्या नेतृत्वात हा फंडिंग राऊंड पार पडला. इतर गुंतवणूकदारांत अमित गोयल (क्नाम), रणजीत यादव (इन्फो एज, कार देखो) यांचाही समावेश होता.
रेव्हफिनचे संस्थापक समीर अग्रवाल म्हणाले की, “भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. मात्र, वित्त पुरवठ्याचे पर्याय नसल्याचा एक मोठा अडथळाही आहे. रेव्हफिनचा ईव्ही वित्त पुरवठा प्लेटफॉर्म ग्राहकांची धाकधूक आणि उत्पादनांच्या जोखमीच्या आव्हानांवर मात करतो. जेणेकरून सर्वांना सुलभरीत्या आणि सहजगत्या वित्त पुरवठा होऊ शकेल. फंडिंगमधील निधीच्या या ताज्या प्रवाहामुळे आम्हाला सुसंघटितरीत्या ईव्ही वित्त पुरवठा क्षेत्रातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी मोठी रसद मिळणार आहे. या माध्यमातून रेव्हफिन हा ईव्हीला अर्थ पुरवठा करणारा अग्रगण्य ब्रँड म्हणून उदयास आणण्यातही मदत मिळणार आहे.“
२०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांच्या वित्त पुरवठ्याच्या बाजारपेठेचा आकार ५० अब्ज डॉलर्सवर (३.७ ट्रिलियन डॉलर्स) जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याकडे बघता रेव्हफिन उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यंदा इलेक्ट्रिक तीनचाकींच्या (ई ३ डब्ल्यू) वित्त पुरवठ्याची २०% बाजारपेठ काबीज करण्याच्या योजनेवर काम करत आहे. सन २०३० पर्यंत नव्या तीनचाकी वाहनांच्या विक्रीत (३ डब्ल्यू) ई ३ डब्ल्यू वाहनांचा वाटा ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत राहणार आहे.