
दैनिक स्थैर्य । 2 मे 2025। फलटण । मिरगाव ता.फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक दिगंबर गायकवाड यांची जिल्हा परिषद सातारा यांच्यावतीने देण्यात येणार्या सन-2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पारदर्शकपणे जिल्हा पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागविले. त्याचे क्रॉस चेकिंग करून व प्रत्यक्ष सादरीकरण केले. त्यानंतरच पुरस्काराची अधिकृत घोषणा केली.
दिगंबर गायकवाड यांच्या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर, सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख तसेच राज्य कोअर कमिटीचे सदस्य नंदकुमार दंडिले, राज्याध्यक्ष विकास खांडेकर, जिल्हा सेवा मंचाचे उपाध्यक्ष विजय मोरे, संपर्क प्रमुख राजेश पाटोळे, प्रसिद्धीप्रमुख तात्याबा भोसले, तालुका सरचिटणीस राहुल नेवसे यांनी अभिनंदन केले.