दिगंबर आगवणे यांना वैद्यकीय सुविधेसाठी सातारला हलवले; पोलीस प्रशाशनाची कार्यवाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व स्वराज कारखाना व पतसंस्थेने आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून दिगंबर आगवणे हे फलटण येथील अधिकार गृहाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसलेले होते. त्यांची आज वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचाराची नितांत आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय उपचार घेण्यास दिगंबर आगवणे यांनी मज्जाव केल्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व त्यांच्या टीमने दिगंबर आगवणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.

यावेळी मला तुम्ही असा हात लावू शकत नाही ? तुम्ही लोकशाही मोडत आहात. मी गळफास घेईन. मला न्याय मिळेळपर्यँत मी उपोषणाला बसणार आहे, असे म्हणत पोलीस प्रशासनाला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व त्यांच्या टीमने दिगंबर आगवणे यांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले आहे.

उपोषण स्थळी चाललेला प्रकार बघण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी त्या वेळी गर्दी केली.


Back to top button
Don`t copy text!