फलटणकरांसाठी युवा नेते दिगंबर आगवणे साकारत आहेत १०० ऑक्सिजन बेड्स; सर्वांना सर्वोत्तम उपचार देणार : दिगंबर आगवणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १९ : आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्व सामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण – सातारा रोड वरील पूर्वीच्या शाईन एक्सप्रेस लॉंड्री येथे १०० ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक्सिजन बेड्स कमी पडत आहेत. ऑक्सिजन बेड्ससाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना विविध वशिले लावावे लागत आहेत. अशामध्ये तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी युवा नेते दिगंबर आगवणे हे स्वतः अडचणीत असताना सुद्धा फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देत आहेत. येथे सर्वसामान्य नागरिकांना बेड्स हे प्राध्यानाने दिले जातील अशी ग्वाही, आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांनी या वेळी दिली.

फलटण तालुक्यातील ऑक्सिजन बेड्स साठी प्रत्येक रुग्णांचे नातेवाईक काळजीत आहेत. अनेकवेळा येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व नातेवाईक यांच्यात वादाचे प्रसंग उपस्थित राहत आहेत. मात्र, जे-जे प्रयत्न करायला पाहिजे, ते-ते सर्व प्रयत्न येथील कर्मचारी करीत आहे. अधिकाधिक नातेवाईक बेड उपलब्धतेबाबत विचारपूस करीत आहेत. तर, रेमडेसिविर इंजेक्शनसाठीही अनेकांचे फोन येथे येत आहेत. त्यामुळे कर्मचारी उपलब्धतेनुसार त्यांना माहिती देत आहे. त्या मुळे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य कोरोन बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध व्हावेत ह्या साठी मी स्वतः १०० ऑक्सिजन बेड्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती युवा नेते दिगंबर आगवणे यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून युवा नेते दिगंबर आगवणे हे स्वतः आर्थिक अडचणीत आहेत. सध्या हि ते आर्थिक अडचणीत असताना फलटण मधील सर्वसामान्य जनतेसाठी स्वतःची जमीन विकून १०० ऑक्सिजन बेड्स उभारण्याचा निर्णय दिगंबर आगवणे यांनी घेतलेला आहे. सर्वोत्तम उपचार देण्यासाठी आगामी काळामध्ये आपण कटिबद्ध आहे व कटिबध्दच राहू, अशी ग्वाही युवा नेते दिगंबर आगवणे यांनी दैनिक स्थैर्यशी बोलताना दिली.


Back to top button
Don`t copy text!