दिगंबर आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । फलटण । दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप हे दिशाभूल करणारे आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बॅंकाना तारण ठेवलेली आहे. दिगंबर आगवणे यांना पुर्वीच्या काळामध्ये चांगल्या भावनेनेच मदत केलेली होती. दिगंबर आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल आहेत, असा टोला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

सुरवडी, ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यापुर्वीच्या आमदारकीला जी मते मिळाली ती फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच आगवणे यांना मिळालेली आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बॅंकाना तारण ठेवलेली आहे. त्यामुळे विविध बॅंका अडचणीत आलेल्या आहेत. दिगंबर आगवणे यांनी विविध बॅंकाना यापुर्वीच फसवले आहे. दिगंबर आगवणे यांना पुर्वी जी मदत केली होती ती चांगल्या भावनेनेच मदत केलेली आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

दिगंबर आगवणे यांनी जे आरोप केलेले आहेत, ते संपुर्ण बिनबुडाचे आहेत. दिगंबर आगवणे यांना जे पैसे दिलेले आहेत ते चेकने किंवा बॅंकेच्या द्वारेच दिलेले आहेत. आगवणे यांच्यावर जो विश्वास ठेवला तो माणुसच बोगस निघाला असल्याचे मत सुध्दा खासदार रणजितसिंह नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिगंबर आगवणे यांना यापूर्वी स्वराज पतसंस्थेमधुन कर्ज दिलेले होते. त्यावेळी आगवणे यांना पुन्हा पैश्याची गरज भासल्याने त्यांनी पुन्हा नव्याने कर्ज काढले व त्यावेळी जुने कर्ज भरले. आगवणे यांच्या कर्जाचा कधीही हप्ता आम्ही भरलेला नव्हता व नाही, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आगवणे ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेले होते त्यावेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. व त्या कर्जासाठी त्यांनी तारण सुध्दा ठेवलेले होते. तर ते कर्ज बोगस कर्ज कसे होईल, असा सवाल ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला.

दिगंबर आगवणे यांच्याकडून मला साधारण आठ कोटी येणे आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे दोन कोटी होल्ड केलेले आहेत. आठ कोटी मधुन दोन कोटी वजा करता सुमारे सहा कोटी त्यांच्याकडून येणे आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेली आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

दिगंबर आगवणे यांना जो कोणी मदत करत असेल तो त्याचे परिणाम नक्कीच भोगतील. गेल्या काळामध्ये आगवणे यांना मदत केलेली होती, त्याचे परिणाम मी बघत आहे. त्यामुळे त्यांना जो कोणी मदत करत असेल तो त्याचे परिणाम नक्कीच बघेल, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!