
दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२२ । फलटण । खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे म्हणून न्याय मिळण्यासाठी दिगंबर आगवणे हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्या सोबतच दिगंबर आगवणे यांनी फलटण तालुक्यातील अनेकांची आर्थिक फसवणूक केलेले आहे; त्या बाबतचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. यासाठी भारतीय जनता पार्टी दिगंबर आगवणे यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे फलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर दिगंबर आगवणे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी समोरा समोर आज उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत प्रशासन नेमकी कोणती भुमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे. दोघेही समोरासमोर उपोषणाला बसल्याने यामध्ये प्रशासनाची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. दिगंबर आगवणे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज कारखान्याचे संचालकाच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठीचे निवेदन दिलेले आहे. तर भारतीय जनता पार्टीने दिगंबर आगवणे यांनी फलटण तालुक्यातील अनेकांची आर्थिक फसवणूक केलेली त्याबाबत सबळ पुरावे भाजपाकडे आहेत. याबाबत दिगंबर आगवणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपा सुध्दा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. आज नक्की प्रशासन काय भुमिका घेणार ? याकडे आता तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेले आहे.