अपशिंगे येथील जवानांचे कर्तव्य बजावताना निधन


दैनिक स्थैर्य । दि.११ मे २०२२ । सातारा । अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील जवान सुधीर सूर्यकांत निकम (वय 35) यांचे कर्तव्य बजावत असताना आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी शासकीय इतमामात अपशिंगे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुधीर निकम हे मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये देशसेवा बजावित होती.

सध्या ते गुजरातमधील जामनगर येथे सेवेत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरु होते. अशातच आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. सुधीर निकम यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचे वडील सूर्यकांत शंकर निकम हे कर्तव्य बजावित असताना हुतात्मा झाले होते. त्यांचे धाकटे बंधू हेदेखील लष्करी सेवेत कार्यरत आहेत. ते सध्या पंजाबमधील भटींडा येथे आहेत. सुधीर निकम यांची पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी गावातून अंत्ययात्रा काढली जाणार आहे. अपशिंगेत असलेल्या विजयस्तंभ येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!