दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
येत्या काही वर्षात फलटणचा दुष्काळ कायमचा संपणार आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांनी पिढ्यान्पिढ्या अडकलेल्या फलटण तालुक्यातील ५७ गावांचा नीरा-देवघरचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. या कार्याबद्दल दुष्काळी भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी भाजपाकडून ‘संवाद दौरा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.
हा संवाद दौरा १३ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केला आहे. या दौर्यात फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, मार्गदर्शक अॅड. नरसिंह निकम, युवा नेते धनंजयदादा साळुंखे-पाटील, फलटण विधानसभा प्रभारी विश्वासराव भोसले, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे-पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, गटनेते फलटण नगरपरिषद अशोकराव जाधव, किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर, अल्पसंख्यांक सेल राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, सातारा जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष धनंजय पवार, महादेव अलगुडे व महादेव पोकळे या मान्यवर जनतेशी संवाद साधणार आहेत.
या संपर्क दौर्यास तालुक्यातील तमाम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण तालुका भाजपाचे पूर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, पूर्व मंडल अध्यक्ष युवा मोर्चा संतोष गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष युवा मोर्चा सनी मदने, महिला आघाडी अध्यक्षा सौ. उषा राऊत यांनी केले आहे.
- संवाद दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे –
- १४ फेब्रुवारी २०२४ : सायंकाळी ४ ते ७ – वाजेगाव, निंबळक, मुंजवडी, गुणवरे येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- १५ फेब्रुवारी २०२४ : सायंकाळी ४ ते ७ – सोनवडी खुर्द/बु., तिरकवाडी, भाडळी खुर्द व झिरपवाडी येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- १६ फेब्रुवारी २०२४ : सायंकाळी ४ ते ७ – ठाकुरकी, तावडी, कुरवली खुर्द, विंचुर्णी येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- १७ फेब्रुवारी २०२४ : सायंकाळी ४ ते ७ – फरांदवाडी, घाडगेवाडी, खडकी, मिरगाव व वाठार निंबाळकर येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- १८ फेब्रुवारी २०२४ : सकाळी ८.३० ते सायं. ७ – मुळकीवाडी, काशिदवाडी, निंभोरे, ढवळेवाडी, भिलकटी, वडजल, चौधरवाडी, सुरवडी येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- १९ फेब्रुवारी २०२४ : सकाळी ८.३० ते सायं. ६.३० – धुळदेव, विडणी, पिंप्रद, शेरेशिंदेवाडी, वडले, नाईकबोमवाडी येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- २० फेब्रुवारी २०२४ : सायं. ४ ते सायं. ७ – खराडेवाडी, घाडगेमळा, डोंबाळवाडी, काळज, तडवळे येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- २१ फेब्रुवारी २०२४ : सकाळी ८.३० ते सायं. ७ – कोरेगाव, चव्हाणवाडी, आरडगाव, तरडगाव, कापडगाव, विठ्ठलवाडी, सासवड येथे जाहीर सभा व स्नेहभोजन
- २२ फेब्रुवारी २०२४ : सकाळी ८.३० ते सायं. ७ – सालपे, तांबवे, शेरेचीवाडी (आ.), कापशी, आदर्की खु., टाकुबाईचीवाडी, हिंगणगाव येथे जाहीर सभा व स्नेहभोजन