
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२३ । फलटण ।
लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने माजी प्रांतपाल लायन प्रभाकरजी आंबेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मधुमेह चाचणी शिबिर फलटण येथील मोरया हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन फलटण मधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. पूनम पिसाळ व प्रसिद्ध कान,नाक,घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास झोन चेअरमन लायन सौ. निलम लोंढे- पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अशी माहिती लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमचे अध्यक्ष लायन सौ. वैशाली चोरमले यांनी दिली आहे. याप्रसंगी कार्यक्रमास लायन सौ. मंगल घाडगे, फलटण लायन्स क्लबच्या सेक्रेटरी सौ. ऋतुजा गांधी, खजिनदार लायन सुजाता यादव, लायन डॉ.योगिता बंडगर, लायन सौ. रश्मी चव्हाण, पॅथॉलॉजिस्ट सौ. स्वप्नाली जाधव इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी मधुमेह चाचणी शिबिराबद्दल माहिती देताना पुढे सौ. वैशाली चोरमले म्हणाल्या की, लायन्स क्लब इंटरनॅशनल संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक वैद्यकीय, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर काम केले जात असून फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही भविष्यातही अनेक समाजपयोगी व विशेष करून महिलांच्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवणार असल्याचे सांगून लायन चोरमले म्हणतात आज मधुमेह रोगाने अनेक रुग्ण त्रस्त असून या रुग्णांची मोफत तपासणी करण्याचा आम्ही लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून करीत असून आज विशेष करून झालेल्या या शिबिरामध्ये जवळपास 57 रुग्णांनी सहभाग नोंदवून आपली मधुमेह चाचणी करून घेतली असल्याची माहिती शेवटी लायन सौ.चोरमले यांनी दिली आहे.
कार्यक्रमास सौ. जयश्री वाघमोडे, सौ. भाग्यश्री काटकर, दिलीप तेली, सचिन तेली, डॉ. रमाकांत सुतार, सचिन सावंत,सौ. सुलोचना सावंत, सौ. रेश्मा चोरमले, सौ. नंदा चोरमले, सौ.ऋतुजा चोरमले, सौ कांताबाई कुंभार, सौ. लक्ष्मी गुळदगड, सौ.बेबी चोरमले, सविता गायकवाड सौ. वैशाली गायकवाड, निर्मला चोरमले, अरुणा चोरमले, सौ. जयश्री हाके इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.