धूम स्टाईल मोबाईल चोरटे जेरबंद; पाचगणी पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । पाचगणी । पारसी पॉईंट दरम्यानच्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरील बाकड्यावर बसून मोबाईलवरील मॅसेज पहात असतांना अज्ञात बाईक स्वाराने हातातील मोबाईल घेऊन धूम स्टाईलने पसार झालेल्या चोरट्यास पाचगणी पोलिसांनी गतिमान तपास करीत जेरबंद केले.

याबाबत पोलीस स्टेशनवरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी विकास पद्दद्माकर अभ्यंकर वय वर्षे 54 रा. संजीवन विद्यालय पाचगणी, ता. महाबळेश्‍वर हे पारशी पॉईंट दरम्यानच्या रस्त्यावरील फूटपाथवरील बाकड्यावर दि. 2 जुलै रोजी साडेतीनच्या दरम्यान स्वतःच मोटोरोला कंपनीचा मोबाईल हातात घेऊन मेसेज पहात अचानक धूम स्टाईलने विनानंबर प्लेट असणार्‍या पल्सर बाईकवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता.

15 हजारांचा किंमतीचा मोबाईल घेऊन पोबारा करणार्‍या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे गतिमान केली. त्यानुसार पोलिसांच्या तपासात दोन अज्ञात आरोपी निष्पन्न झाले. वाई येथे चोरटयांचा शोध घेवून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. त्यांचेकडून चोरीस गेलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल व नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटार सायकल जप्त करुन आरोपी यांना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचेकडे हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व सहा.पोलीस निरीक्षक सतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर, पो. हवालदार अविनाश बाबर पो. ना. निलेश माने, जितेंद्र कांबळे, पो. ना. शिवशंकर शेळके, पो. ना. मनोज जायगुडे, पो. ना. सचिन बोराटे, पो. काँ. सागर नेवसे यांनी केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!