श्रीमंत धिरेंद्रराजे व श्रीमंत डॉ. संयुक्ताराजे यांचा विवाहसोहळा राजेशाही थाटात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २८ : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते स्व. दादाराजे खर्डेकर – निंबाळकर यांचे नातू तर फलटण पंचायत समितीचे सभापती व सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर निंबाळकर यांचा विवाह श्रीमंत नितीनराव काळे – देशमुख यांची सुकन्या श्रीमंत डॉ. संयुक्ताराजे काळे – देशमुख यांच्याशी संपन्न झाला.

सदरील विवाहसोहळा कोरेगाव पार्क, पुणे येथील वेस्टीन हॉटेलमध्ये राजेशाही थाटात संपन्न झाला. कोरोनाचे सावट अजूनही आपल्या राज्यावरून गेलेले नसल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग व इतर कोरोना बाबतच्या सर्व खबरदारी घेवून सदरील विवाह सोहळा संपन्न झाला.

माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तामामा भरणे, राजमातोश्री श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर), राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, शरयू उद्योग समूहाचे शिल्पकार श्रीनिवास पवार व शर्मिली पवार, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, वाई – खंडाळा – महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक दीपक तावरे, सुहास दिवशे, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, स्मार्ट सिटी पुणेचे राजेंद्र जगताप, पणन महामंडळाचे संचालक सतीश सोनी, कार्यकारी संचालक सुनील पवार, सुधीर तुंगार, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौ. सुजता ढोले आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सर्वच क्ष्रेत्रातील मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!