दैनिक स्थैर्य । दि. ३१ डिसेंबर २०२२ । फलटण । विडणी गावचे सुपुत्र व मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथील अपर सचिव धिरज कांतीलाल अभंग यांचा वाढदिवस विडणी येथे त्यांचे निवासस्थानी उत्साहात पार पडला.
अत्यंत साध्या परिवारातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन ते या पदावर आले आहेत. या प्रसंगी त्यांनी तरुण मुलांना IPS, IAS अधिकारी होण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विडणी गावामध्ये अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली विडणी येथील विद्या नगर येथील प्राथमिक शाळा डिजिटल केली आहे. तसेच विडणी गावामध्ये ग्रंथालय सुरू केले आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये त्यांचे बंधू सागर अभंग हे लोकनियुक्त सरपंच झाले आहेत. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, सरपंच सागर अभंग, माजी सरपंच जे. के. अभंग, सदाशिव जगताप, प्रा. विजय अभंग, अक्षय अभंग, कुंदन शेंडे, कृष्णा शेंडे, सुयश बडवे व सामाजिक शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व विडणीकर ग्रामस्थ उपस्थित होते.