
स्थैर्य, फलटण, दि.२७ : आगामी होणारी ढवळेवाडी (निंभोरे) ग्रामपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
ढवळेवाडी (निंभोरे) येथील स्थानिक राजकीय गटाने विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद रणवरे व निंभोरे येथील बाळकृष्ण रणवरे, प्रकाश रणवरे, तुळशीदास रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रवेशा दरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
ढवळेवाडी (निंभोरे) गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने गावचा विकास व गावामधली एकी अबाधित राखण्यामध्ये सर्वांनाच यश येते. ढवळेवाडी गावचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम असून आगामी काळामध्ये ढवळेवाडी (निंभोरे) गावामध्ये लागणाऱ्या सर्व सोयीसुविधांसाठी आमच्याकडुन विशेष प्रयत्न केले जातील, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
ढवळेवाडी (निंभोरे) येथील श्रीराम विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विलास माने म्हणाले की, ढवळेवाडी गावचा विकास करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्हा सर्व जणांना काम करण्याची इच्छा आहे व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व हे सर्वांना मान्य असल्याने आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करीत आहोत.
यावेळी ढवळेवाडी (निंभोरे) येथील श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास माने, श्रीराम विकास सोसायटीचे संचालक विलास ढवळे, सुरेश माने, नामदेव जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सुतार, सतीश गुंजवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पवार, राजेंद्र माने, अंकुश रणवरे, विठ्ठल माने, दत्तात्रय माने, वामन सुतार, भरत माने, विठ्ठल माने, नवनाथ निकम, बबन ढवळे, वसंत गुंजवटे, जयवंत रणवरे, भगवान माने, दिलीप माने, नवनाथ माने, विष्णू माने, सोमनाथ माने, संपत माने, बाळासाहेब बोगांने, गणपत माने, भरत माने, मोहन रणवरे, लक्ष्मण माने, प्रशांत ढवळे, विराज रणवरे, सतीश रणवरे, विलास रणवरे, स्वप्नील मदने, बाळू मदने, अशोक माने, रामदास जगताप यांनी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे.