ढवळ अवैध वाळू उपशावर पोलिसांचा छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार


दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ढवळ (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात अवैध उपसा केलेली १ ब्रास वाळू व या वाळूची चोरटी वाहतूक करणारा सोनालिका कंपनीची ट्रॅक्टरट्रॉली असा सुमारे १० लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा वाळू उपसा करणारा आरोपी फरार झाला असून त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याची अधिक माहिती अशी, १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ढवळ हद्दीत शिंदे नावाच्या तलावामध्ये इसम विनोद राजेंद्र लोखंडे (राहणार ढवळ) यांनी अवैधरित्या कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करीत असताना सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टरट्रॉली व १ ब्रास वाळू असा एकूण १०,५०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यावेळी आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला आहे.

या चोरीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बदने करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!