स्थैर्य, कोळकी, दि. ५ : फलटण शेजारी विस्तारलेली मोठी ग्रामपंचायत म्हणजे कोळकी ग्रामपंचायत होय. या ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 3 म्हणजेच सटवाई वार्ड मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने धर्मराज देशपांडे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. तालुक्यातील 80 ग्रामपंचायती निवडणूक सध्याला लागलेली आहे. आज दिनांक ४ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. कोळकी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 3 मधून धर्मराज दिलीप देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता व आज त्यांच्या उमेदवारीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्कामोर्तब झालेल्या आहे.
धर्मराज देशपांडे यांच्या माध्यमातून कोळकी ग्रामपंचायतीच्या वार्ड नंबर ३ ला अभ्यासू व्यक्तिमत्व लाभलेले आहे. धर्मराज देशपांडे हे व्यवसाय निमित्त मुंबई येथे गेलेले होते व तेथे त्यांनी चांगल्या रीतीने काम करून आपल्या व्यवसायामध्ये चांगले पाय रोवलेले आहेत. कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी धर्मराज देशपांडे कटिबद्ध असून आगामी काळामध्ये कोळकी ग्रामपंचायतीमधील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे धर्मराज देशपांडे यांनी स्पष्ट केलेले आहे.
आगामी काळामध्ये कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वार्ड नंबर ३ चे सर्व प्रलंबित प्रश्न अग्रभागी ठेवून आपण सोडविणार आहोत. जर गरज भासली तर कोणाच्याही निधीची वाट बघत न बसता स्वखर्चाने आपण विविध विकास कामे करू, असेही धर्मराज देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.