धन्यकुमार तारळकर यांना शासनाचा ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
जि. प. प्राथमिक शाळा मदनेनायकुडेवस्ती (केंद्र – निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा) येथे कार्यरत असणारे श्री. धन्यकुमार प्रल्हाद तारळकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्कार ५ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

श्री. धन्यकुमार तारळकर हे उच्च विद्याविभूषित असून या त्यांच्या अथांग ज्ञानाच्या जोरावर त्यांनी अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले आहेत. ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

सध्याचे युगे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य बनला आहे. हे त्यांनी ओळखून त्यांनी कामकाज केलेल्या सर्व शाळा डिजिटल बनवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला आहे. सलग २० वर्ष विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे व त्यातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे.

क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रमात ‘प्राथमिक शिक्षकांना मूल्यमापनात येणार्‍या समस्यांचा अभ्यास’ या विषयात एम.फिल. साठी त्यांनी शोधनिबंध सादर केला आहे. नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेऊन वेळोवेळी यश संपादन केले आहे. त्यांच्या या विविध उपक्रमांची वेळोवेळी प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेली आहे.

शैक्षणिक कार्य आणि सामाजिक क्षेत्रात कर्तव्यासाठी कटीबद्ध समाजासाठी त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्यात त्यांच्या सौभाग्यवती सौ. तेजश्री तारळकर यांचा मोलाचा वाटा आहे.

महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर मॅडम, फलटण तालुका गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अनिल संकपाळ, श्री. जी. सी मठपती, केंद्रप्रमुख श्री. बन्याबा पारसे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, पालक वर्ग, मित्र परिवार, नातेवाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!