दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । गोखळी । राजाळे ता. फलटण येथील ह. भ. प. धनसिंग शंकरराव काकडे देशमुख उर्फ गुरूजी यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
राजाळे गावचे संत गाडगे महाराज अशी ओळख निर्माण करणारे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करून शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे आदर्श शिक्षक, रसिक कला व क्रीडा मंच चे मार्गदर्शक, आळंदी ते पंढरपूर पायीवारीचे राजाळे दिंडीचे प्रमुख, उत्तम वक्ते, प्रगतशील शेतकरी,
स्वच्छतेचा ध्यास, गावातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान असायचे, कोणत्याही कामाची लाज न बाळगता ते स्वतः हातात झाडू घेऊन सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करत.
आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, भावजय, एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली असा परिवार आहे.
मुलगा डॉ. विजय काकडे शास्त्रज्ञ, एक मुलगी शिक्षिका, दुसरी मुलगी कृषी अधिकारी, एक मुलगी स्वतःचा लोणचे व मसालेचा व्यवसाय, एक मुलगी गृहणी आहे.
त्यांनी सांगवी, टाकळवाडा, गोखळी, निंबळक या प्राथमिक शाळेत आदर्श काम केले. राजाळे येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.