धनगर समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहणार : यशवंतराव होळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १४ : धनगर हा एक हिंदू समाज आहे, जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो. धनगर समाजामधील लोकांचे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा या राज्यांसह इतर राज्यात सुद्धा वास्तव्य आहे. मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांनी धनगर समाजाच्या हितासाठी व धनगर समाजातील सर्व सामान्य नागरिक पुढे जाण्यासाठी जे काम केलेले आहे तेच डोळ्यासमोर ठवून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजातील बांधवांच्या उन्नतीसाठी आपण कार्यरत राहणार आहोत अशी माहिती अहिल्यादेवी होळकर यांचे थेट वंशज यशवंतराव होळकर यांनी दिली.

फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन भीमदेव बुरुंगले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारख्यान्याचे संचालक महादेव माने, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांगदेवराव खरात यांची प्रमुख उपथिती होती.


Back to top button
Don`t copy text!