दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2024 | पंढरपूर | धनगर समाजाच्या मागणीनुसार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांची पाठिंबा असलेली पत्रे ही पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांच्या कडे सुपुत्र करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. भिमदेव बुरुंगले व महात्मा एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी दिली.
याबाबत चोरमले यांनी यावेळी स्पष्ट केले की; गेली कित्येक वर्ष धनगर समाज आपल्या अन्यायासाठी लढत आहे सरकारने देखील यापूर्वी अनेक वेळा आश्वासन दिले आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलाविण्याची गरज भासली तरी अधिवेशन बोलवून त्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा तात्काळ अध्यादेश काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करावी! यासाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी आपल्या पाठिंबाची पत्रे पंढरपूर येथे बसलेल्या आंदोलन करते गणेश केसकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडे सुपूर्त केली आहेत.
यावेळी फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भिमदेव बुरुंगले व आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.